अखेर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील पिस्तुल सापडलं

0

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयला मोठ यश मिळालं आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल सीबीआयच्या हाती लागलं आहे. हत्या करून अरबी समुद्रात फेकलेलं पिस्तुल सीबीआयने शोधून काढलं आहे. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ठाण्याजवळच्या खारेगाव खाडीतून हत्येचं पिस्तुल शोधून काढण्यात आलं आहे. सीबीआयने हे पिस्तुल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here