बेदरकारपणे दुचाकी चालवत मुक्या जनावराचा घेतला प्राण

0

रत्नागिरी : विनापरवाना बेदरकारपणे दुचाकी चालवून म्हशीला धडक देत अपघात करत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवारी नरबे येथे घडली. याप्रकरणी किशोर मनोहर मांगले (२५,रा.आबलोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तसेच या अपघातात त्याच्या दुचाकीवर मागे बसलेला त्याचा चुलत भाऊ वैभव राम मांगले (१९,रा.आबलोली) हा ही जखमी झाला आहे. ही धडक जोरदार असल्याने म्हशीचा मृत्यू झाला.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here