भाजलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील पावस गुरववाडी येथे शेकोटी घेत असताना अंगावरील गाऊन पेटून भाजलेल्या वृध्देचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरुवार १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.१५ वा. मृत्यू झाला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनंदा गणपत गुरव (७५, रा. पावस गुरवावाडी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. या बाबत त्यांचा मुलगा हरिश्चंद्र गणपत गुरव(५२)यानी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

त्यानुसार, बुधवार ९ फेब्रुवारी रोजी त्या घराजवळी चुलीतील लाकडे पेटवून शेकोटी घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावरील गाऊनवर विस्तव पडल्याने त्याने पेट घेतला. यात त्या गंभीर भाजल्याने त्यांना उपचारांसाठी रात्री १०.३० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारांदरम्यान गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:14 PM 12-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here