सज्जन शक्ती एकत्र आल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही : दत्ताराम सोलकर

0

रत्नागिरी : सज्जन शक्ती एकत्र आल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या समाजाच्या दातृत्वावर पूर्ण होतील, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे जिल्हा संघचालक दत्ताराम सोलकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ समितीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा विभागातर्फे स्नेहमेळाव्याने झाला. मेळावा झाडगाव येथील माधवराव मुळे भवन सभागृहात झाला. न्यूरो सर्जन डॉ. श्रीविजय फडके यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी तालुक्यातील रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

व्यासपीठावर जनकल्याण समितीच्या उपाध्यक्षा डॉ. मनीषा सप्रे, रत्नागिरी नगर संघचालक डॉ. महेंद्र पाध्ये उपस्थित होते. जनकल्याण समितीचे सहकार्यवाह मंदार जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यवाह महेश नवेले यांनी जनकल्याण समितीची स्थापना कशी झाली, कोणकोणते सेवा प्रकल्प जनकल्याण समितीमार्फत चालविले जातात, ७ मोठ्या प्रकल्पांची माहिती, या समाजसेवारूपी कार्यासाठी योगदान इत्यादीचा मागोवा घेतला. रवींद्र पराडकर यांनी आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे डॉ. फडके मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जनकल्याण समितीचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. एखादा रुग्ण रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यालाही अनेक समस्या भेडसावतात. मात्र या समस्या जनकल्याण समितीच्या वतीने लीलया सोडवल्या जातात. हे सेवेचे कार्य असेच उत्तरोत्तर वाढत जाऊ दे. त्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्याची ग्वाही मी देतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मोरे यांनी केले. कार्यक्रमाला जनकल्याण समितीचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील पदाधिकारी, स्वयंसेवक, जनकल्याण समितीचे हितचिंतक व देणगीदार उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:25 PM 12-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here