धक्कादायक : लिलाव पुकारणारे ह्यूज एडम्स स्टेजवरून कोसळले, आयपीएल लिलाव थांबवला

0

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी ऑक्शन सुरू असताना अचानक ऑक्शनर ह्युज एडमेड्स कोसळले. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याच्यावर बोली लावली जात असताना ह्युज एकदम स्टेजवरून खाली पडले.

नेमकं काय घडलं हे आयपीएल आयोजकांकडून सांगण्यात आलेले नाही, पण त्यांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे आयोजकांनी त्वरीत लंच ब्रेक घेतला. आताच हाती आलेल्या बातमीनुसार त्यांची प्रकृती आता ठिक आहे…

आतापर्यंत कोणाकोणावर लावली बोली?

  • श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी (केकेआर) आधीचा संघ – दिल्ली कॅपिटल्स (बोली – केकेआर, दिल्ली, बंगळुरु, लखनऊ, गुजरात)
  • कगिसो रबाडा – ९.२५ कोटी (पंजाब किंग्ज) आधीचा संघ – दिल्ली कॅपिटल्स ( बोली – दिल्ली, गुजरात, पंजाब )
  • शिखर धवन – ८.२५ कोटी (पंजाब किंग्ज) आधीचा संघ – दिल्ली कॅपिटल्स (बोली – दिल्ली, पंजाब, राजस्थान)
  • शिरमन हेटमायर – ८.२५ कोटी (राजस्थान रॉयल्स) आधीचा संघ – दिल्ली कॅपिटल्स (बोली – राजस्थान, दिल्ली, कोलकत्ता, राजस्थान)
  • ट्रेंट बोल्ट – ८ कोटी (राजस्थान रॉयल्स) आधीचा संघ – मुंबई इंडियन्स (बोली – मुंबई, बंगळुरु, कोलकत्ता, राजस्थान)
  • देवदत्त पडिकल – ७.७५ कोटी (राजस्थान रॉयल्स) आधीचा संघ – आरसीबी (बोली – बंगळुरू, चेन्नई, राजस्थान, मुंबई)
  • पॅट कमिन्स – ७.२५ कोटी (केकेआर) आधीचा संघ – केकेआर (बोली – कोलकत्ता, गुजरात)
  • फॅफ डुप्लेसी – ७ कोटी (आरसीबी) आधीचा संघ – सीएसके (बोली – बंगळुरू, चेन्नई, दिल्ली )
  • क्विंटन डि कॉक – ६.७५ कोटी (लखनऊ सुपर जायंट) आधीचा संघ – मुंबई इंडियन्स (मुंबई, चेन्नई, लखनऊ, दिल्ली. कोलकत्ता)
  • मोहम्मद शमी – ६.२५ कोटी (गुजरात टायटन्स) आधीचा संघ – पंजाब किंग्ज (बोली – गुजरात, बंगळुरु, कोलकत्ता, लखनऊ)
  • डेविड वॉर्नर – ६.२५ (दिल्ली कॅपिटल्स) आधीचा संघ – सनराईजर्स हैद्राबाद (बोली – दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, पंजाब, मुंबई)
  • आर.अश्विन – ५ कोटी (राजस्थान रॉयल्स) आधीचा संघ – पंजाब किंग्ज(बोली – राजस्थान, दिल्ली)
  • मनिष पांडे – ४.६० कोटी (लखनऊ सुपर जायंट) आधीचा संघ – सनराईजर्स हैद्राबाद (बोली – हैद्राबाद, दिल्ली, लखनऊ)
  • ड्वेन ब्रावो – ४.४० कोटी (सीएसके) आधीचा संघ – सीएसके (बोली – चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली)
  • रॉबिन उथप्पा – २ कोटी (सीएसके) आधीचा संघ – सीएसके (बोली – चेन्नई)
  • जेसन रॉय – २ कोटी (गुजरात टायटन्स) आधीचा संघ – सनरायजर्स हैद्राबाद (बोली – गुजरात)
  • हर्षल पटेल – १०.७५ कोटी (आरसीबी) आधीचा संघ – आरसीबी (बोली – चेन्नई, बंगळूरु, हैद्राबाद)
  • नितीश राणा – ८ कोटी (केकेआर) आधीचा संघ – केकेआर (बोली – मुंबई, चेन्नई, केकेआर, लखनऊ)
  • जेसन होल्डर – ८.७५ कोटी (लखनऊ) आधीचा संघ – सनरायजर्स हैद्राबाद (बोली – मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, राजस्थान, लखनऊ)
  • दीपक हुड्डा – ५.७५ कोटी (लखनऊ) आधीचा संघ – पंजाब किंग्ज (बोली – राजस्थान, आरसीबी, मुंबई, चेन्नई, लखनऊ)
  • हसरंगा – १०.७५ कोटी (आरसीबी) आधीचा संघ – आरसीबी (बोली – हैद्राबाद, पंजाब, लखनऊ, बंगळुरु)
  • अनसोल्ड खेळाडू – शाकीब अल हसन, स्टीव स्मिथ , सुरेश रैना, डेविड मिलर

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:53 PM 12-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here