पाली पाथरट येथील श्री लक्ष्मी पल्लीनाथ देवस्थानच्या शिमगोत्सव नियोजनाची सभा मुख्य मानकरी व देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उद्या शुक्रवार (दि. ६) पालखी सजविणे, रूपे लावणे आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी साडेसात ते रात्री अकरापर्यंत पालखी दर्शन व पालखी नाचविणे, शनिवारी (ता. ७) दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेत नियोजित ठिकाणी होळी आणण्यासाठी जाणे, रात्री साडेनऊ ते साडेदहादरम्यान नवस बोलणे, फेडणे आदी कार्यक्रम, साडेदहाला नमन होईल. सोमवारी (ता. ९) होळी खेळविणे, रात्री दहाला पौर्णिमेचा होम, साडेअकराला नमनाचा कार्यक्रम होईल. शिमगोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
