कृषी अवजारांच्या यांत्रिकी मान्यतेचे अधिकार कृषी विद्यापीठात

0

रत्नागिरी : शासनाच्या विविध प्रकारच्या कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या कृषी अवजाराचे यांत्रिकी मान्यतेच अधिकार कृषी विद्यापीठाला देण्यात आले आहेत. त्यासाठी दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विभागाला प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना कृषी मंत्रालयाने केल्या आहेत.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या कृषी अवजारांना यांत्रिकी मान्यता तंत्रविद्यालयात देण्यात आल्या होत्या. मात्र, तेथे सुविधा नसल्याने आता त्यांची मान्यता कृषी विद्यापीठाला देण्यात आली आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये लागणाऱ्या सर्व आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहे. केंद्राच्या योजनांमधून निधी मिळवून विद्यापीठांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही तातडीने केली जाणार आहे.

शेती अवजारांची किंमत जर ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या यंत्राची केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थांकडून चाचणी करून त्यांना मान्यता देण्याच्या मार्गदर्शिका केंद्राने दिलेल्या आहेत. या अधिसूचित संस्थांमध्ये महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here