जिल्ह्यातील 46 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस

0

रत्नागिरी : जिल्ह्यात १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास प्रारंभ झाला आहे. आरोग्य कर्मचारी, फंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना बुस्टर डोस दिला जात आहे. आतापर्यंत ४६ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांना बुस्टर डोस मिळाला आहे. परंतु अनेक आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर पुन्हा पुन्हा कोरोनाबाधित झाल्याने बुस्टर डोसचा कालावधी लांबत आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्येही दुसर्‍या डोसनंतर बुस्टर डोसचा कालावधी अधिक आहे. त्याचबरोबर केवळ सहव्याधी असलेल्यांनाच बुस्टर डोस देण्यात येत आहे. आतापर्यंत २.३९ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४,७४५ आरोग्य कर्मचार्‍यांनी, तर ३,३९० टलाईन वर्कर यांनी बुस्टर डोस घेतला आहे. मात्र, ६० वर्षांवरील केवळ ३,४२८ जणांनीच बुस्टर डोस घेतला आहे. कोविशिल्डचे दोन्हीही डोस पूर्ण करणार्‍या परंतु आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित सापडत असल्यामुळे बुस्टर डोससाठी अनेकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने आता बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे. लस घेण्यास उशिरा झाल्यामुळे बुस्टरसाठी काहींना प्रतिक्षा करावी लागत आहे. कोरोनाचे सुरक्षा कवच म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने कोरोना प्रतिबंधक लस घेणे, सर्वांसाठीच आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

दोन्ही डोस घेतलेल्यांना ९ महिन्यानंतर बुस्टर डोस देण्यात येत आहे. बहुतेकांचा हा कालावधी पूर्ण होण्यास वेळ आहे. ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांनाच बुस्टर डोस देण्यात येत आहे. या कालावधीत पॉझिटिव्ह आल्यास कालावधी लांबतो. – डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 12-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here