आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी मोठी घोषणा केली आहे. कोकणचं वैभव राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जलदुर्गांचा विकास करुन पर्यटन वाढवू. तसेच येत्या एप्रिलमध्ये कोकणात व्हायरोलॉजी लॅब सुरू करणार आणि चांगली दवाखाने सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
