मिरकरवाडा येथे मच्छीच्या शेडवरुन राडा

0

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील मच्छीच्या शेडवरुन एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली असून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते 12 वा.कालावधीत घडली आहे.

अनंत शिवलकर, अनिता शिवलकर, शुभम शिवलकर, गोट्या मोरे, पप्पू शिवलकर सर्व रा.(पेेठकिल्ला, रत्नागिरी) आणि संजय पुन्नातळीकर (रा. सिध्दिविनायक नगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

त्यांच्यात मिरकरवाडा येथील मच्छीच्या शेडवरुन न्यायालयात वाद सुरु आहे. यातूनच शनिवारी सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून त्यांनी एकमेकांना शिवीगाळ व बांबुच्या काठीने तसेच हातांनी मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 14-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here