अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त मारहाणप्रकरणी कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

रत्नागिरी : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी निषेध केला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

अमरावतीतील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी आयुक्त गेले असता त्यांच्यावर काही महिलांनी शाई फेकली. त्याचबरोबर धक्काबुक्की करून त्यांच्यावर हल्ला केला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या गाडीची दोन्ही चाके पंक्चर करण्यात आली. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला होणे ही चिंताजनक बाब असून त्याचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघ निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संघटनेचे अध्यक्ष किरण मोहिते आणि सहकाऱ्यांनी हे निवेदन दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:31 AM 14-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here