यंदाच्या होळीत अमंगल कोरोना जाळून खाक होईल – मुख्यमंत्री

0

महाराष्ट्रात पसरलेल्या भीताच्या पार्श्वभूमीवर तसेच जगभरात फोफावत चाललेला ‘कोरोना’ व्हायरस या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन केलं. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, नागरिकांनी काळजी करू नये. तसेच होळीच्या निमित्ताने ते म्हणाले कि, होळी हा आनंदाचा सण आहे. त्यात अमंगल सर्व जाळून टाकण्याची प्रथा आहे. कोरोनाचं संकटही यंदाच्या होळीत जळून खाक होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. दरम्यान, ‘मुंबई, पुणे, नागपूर येथे कोरोनाचं निदान करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. विमानतळांवरही खबरदारी घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. खासगी रुग्णालयातही स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे,’ असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here