रत्नागिरीतील नौकेवर सिंधुदुर्गात कारवाई

0

रत्नागिरी : परवाना ट्रॉलिंगचा आणि जाळे पर्ससीनचे अशा पध्दतीने मच्छिमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील मुसा अब्दुला या नौकेला विजयदूर्ग बंदरासमोरील आठ वावांमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी सकाळी ७ वा.सुमारास पकडले.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेद्वारे परवाना अधिकारी रविंद्र मालवणकर आणि सागरसुरक्षा रक्षक समुद्रात गस्त घालत असताना रविवारी सकाळी ७ वा.सुमारास विजयदूर्ग विजयदूर्ग बंदरासमोरील आठ वावांमध्ये रत्नागिरी येथील मुजाहीर अब्दूल रेहमान होडेकर यांच्या मालकीची मुसा अब्दुल्ला ही नौका उभी होती. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाने चौकशी केली असता इंजिन बेल्ट बदलण्यासाठी नौका उभी ठेवल्याचे तांडेल यांनी सांगितले.

मत्स्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रविंद्र मालवणकर व सागरसुरक्षा रक्षक यांनी नौकेची तपासणी केली असता ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना नौकेवर पर्ससीन जाळी आढळून आली. जाळ्यांची मेससाईज, लायसन्स अटी व शर्तींचा भंग, पर्ससीन मासेमारीस बंदी असताना या नौकेवर पर्ससीन जाळे, नौकांवर मासळी आढळली नाही.नौकेवरील २० खलाशांपैकी फक्त ८ खलाशांचा विमा उतरविलेला आढळून आला. यामुळे महाराष्ट्र  सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कलम १५ नुसार कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:50 AM 14-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here