मुंबई इंडियन्सनं बांधला तगड्या खेळाडूंचा संघ; संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर…

0

पाचवेळा आयपीएलचं जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघानं यंदाच्या मेगा लिलावात अखेरच्या क्षणी मोठा फासा टाकत संघात तगड्या खेळाडूंना दाखल केलं आहे.

लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सचे संघ मालक मुकेश अंबानी, निता अंबानी, प्रशिक्षक झहीर खान, महेला जयवर्दने हातचं राखून बोली लावताना पाहायला मिळाले होते. पहिल्या दिवसात अवघे तीन खेळाडू मुंबईनं विकत घेतले. यात इशान किशनसाठी तब्बल १५.२५ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत मोठा डाव खेळला. तर रविवारी मुंबई इंडियन्सनं वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी झोळी रिती केली.

असा आहे मुंबई इंडियन्सचा २०२२साठीचा संपूर्ण संघ
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, डिवॉल्ड ब्रेविस, रमनदीप सिंह, राहुल बुद्धि, अनमोलप्रीत सिंह, कायरन पोलार्ड, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शौकिन, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, टाइमल मिल्स, अरशद खान, जयदेव उनादकट, रिले मेरिडिथ, बेसिल थंपी, ईशान किशन, आर्यन जुयाल, मयांक मार्कंडे, मुरुगन अश्विन.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 14-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here