राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आपल्या व्यवसायिक कारणांमुळे आपल्याला तितकसे संघटनेकडे लक्ष देता येत नसल्याने हा राजीनामा दिल्याचे सुदेश मयेकर यांनी रत्नागिरी खबरदारला सांगितले आहे. नगराध्यक्ष निवडणुकीच्या उमेदवारीच्या निमित्ताने मिलिंद कीर हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. काही दिवसांपूवी मिलिंद कीर यांनी नाणार प्रकल्पासंदर्भातील राष्ट्रवादीची भूमिका जाहीर करून टाकली होती. आता सुदेश मयेकर यांनी दिलेला राजीनामा यामध्ये काही सबंध तर नाही ना अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. येत्या १४ तारखेला शरद पवार रत्नागिरीत येत असून त्या आधी मयेकरांनी राजीनामा दिल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
