अर्जुना, कोदवली नदीपात्रातील मातीचा भराव व गाळाचा उपसा न केल्यास आंदोलन

0

राजापूर : राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नदीच्या पत्रात अनधिकृतपणे मातीची भर, व जुन्या बांधकामचे, चिरे जांभा दगड व गाळ आणून टाकला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र भरत चालले असून या नद्यांना पूर येऊन शहराला पूराचा धोका निर्माण होत आहे. तरी याप्रकरणी संबधीतावर कारवाई करण्यात यावी व नदीपात्रातील गाळ काढण्यात यावा अशी मागणी राजापूर तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

तसे निवेदन भाजपा महिला मोर्चाचे वतीने प्रांताधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद राजापूर यांना देण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर, शहर अध्यक्ष विवेक गुरव, अरूणा शेवडे, रेणुका गुंडये, सोनल केळकर, शितल रहाटे, सुनिल भणसारी, महेश मणचेकर, अरविंद लांजेकर, मोहन घुमे आदी उपस्थित होते.

गेल्या काही वर्षात अर्जुना आणि कोदवली नदीपात्रे गाळाने होरली आहेत. त्यातच नव्यान अर्जुना नदीनवर करण्यात आलेल्या पुलामुळे मोठया प्रमाणात दगड मातीचा भराव टाकण्यात आला आहे. तसेच काही नागरिक, व्यवसायिक मातीची भर, जुन्या बांधकामाचे चिरे, गाळ नदीपात्रात टाकत आहेत. त्यामुळे राजापूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासन, महसुल प्रशासन व सत्ताधारी मंडळी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत. याकडे या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. नदीपात्रातील गाळामुळे पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील गाळ उपसण्यात यावा अन्यथा भाजपाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:03 PM 15-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here