अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलो, तरी वडिलांची आज फार आठवण येतेय : उत्पल पर्रीकर

0

पणजी : पणजीतून आपण अपक्ष विधानसभा निवडणूक लढवत असलो तरी आज वडिल तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची फार आठवण येत असल्याची प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केली. गोव्यात सोमवारी विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान पार पडलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

HTML tutorial

पणजीतील मतदारांंवर आपला विश्वास असून ते आपल्या पाठिशी ठामपणे उभे राहतील. मतदार जेव्हा मोठ्या संंख्येने मतदानासाठी आपल्या घरातून बाहेर पडतात, तेव्हा निश्चितच मोठा बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे बदल हा नक्कीच घडेल. आपण निवडणुकीसाठी प्रामाणिकपणे प्रचार केला. अन्य राजकीय पक्षांंप्रमाणे आपण कुठल्याही अपप्रचारात गुंतलो नाही. आपल्या वडिलांंनी जो मार्ग दाखवला त्यावर आपण नेहमीच चालत राहिलो व यापुढेही चालत राहणार आहे, असं उत्पल पर्रीकर म्हणाले.

पणजीचे आमदार या नात्याने आपल्या वडिलांंनी जनतेची नेहमीच सेवा केली. त्यामुळे निवडणूकीच्या निमिताने आपल्याला त्यांंची फार आठवण येत असल्याचेही त्यांंनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 15-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here