जैतापूर येथील पत्रकार सचिन नारकर यांचे अपघाती निधन

0

जैतापूर प्राथमिक आरोग्यकेंद्रासमोरुन दळे मठवाडी कडे जाणाऱ्या तीव्र उतारावर टाटा इंडीगो (एम एच . 08 – 8644) पलटी होऊन झालेल्या अपघातात जैतापूर येथील पत्रकार सचिन नारकर यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्रीच्या 10. 30 ते 11 च्या सुमारास झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी या अपघाताची खबर मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीच्या काचा बंद होत्या. त्यामुळे काचा फोडून बाहेर काढत जैतापूर आरोग्य केंद्रात सकाळी 9 च्या सुमारास नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यानी त्यांना मृत्यू घोषित केले. नाटे पोलीसांनी वृत्त समजल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नारकर यांच्या अपघाती मृत्यूमुळे परीसरावर शोककळा पसरली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here