उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा मला फोन आला आणि म्हणाले…; संजय राऊतांचा खुलासा

0

मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. ‘तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका’…आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. ‘संजय राऊतजी तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है’, असं सर्वजण म्हणाले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देखील मला फोन आला आणि मला आर्शिवाद दिले, असं संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, दादर येथील शिवसेना भवनमध्ये संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेसाठी गर्दी जमली आहे. राज्यभरातील शिवसेना कार्यलयातही शिवसैनिक एकवटले आहेत. मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये शिवसैनिकांनी पोस्टबाजी केली आहे. पुण्यातील शिवसेनेच्या पोस्टरबाजी सध्या चर्चेचा विषय आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:18 PM 15-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here