नशेच्या धुंदीत रेल्वेस्थानक परिसरात मित्रांमध्ये जबर हाणामारी

0

रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात दोघा परप्रांतिय मित्रांनी मद्यप्राशन करून धिंगाणा घातला. हे दोघे बुधवारी रेल्वेस्थानक फाटा येथे दारू पिण्यासाठी बसले होते. दहा रुपयांवरून सुरू झालेल्या वादातून एका तरुणाने बाटली फोडून दुसऱ्या तरुणाच्या मानेत घुसवली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या छोटू नामक तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मकसूद सय्यद सलीम (वय २४) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here