फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा सर्वात मोठा घोटाळा : संजय राऊत

0

मुंबई : फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर केले आहे. भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणासे, पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे. राकेश वाधवान हा किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. निकॉन इन्फ्रा कोणाची आहे हे मला विचारायचे आहे. ही नील सोमय्याची आहे आणि तो वाधवानचा पार्टनर आहे मौजेमध्ये एक प्रकल्प त्यांनी उभारला आहे. वाधवानला ब्लॅकमेल केलं आणि जमीनीसोबत 80-100 कोटी घेतले आहेत. राकेश वाधवानच्या खात्यातून 20कोटी गेले आहेत. त्यांनी म्हणे पीएमसी बॅंक घोटाळा काढला म्हणे, पत्रा चाळ घोटाळा काढला. मला त्रास देण्यासाठी माझ्या मित्रांना त्रास देतायत पीएमसी घोटाळ्यातील पैसे वापरतायत, राकेश वाधवान आरोपी आहे आणि आम्ही पैसे वारतोय असं म्हणत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. पीएमसी बॅंकेचा तपास ईडी करतं आहे. त्यामुळे ईडीकडे मी हे कागदपत्र पाठवले. मात्र हा सोमय्या तिथे दही, खिचडी खातो. हे सर्व ईडीचे एजंट झाले आहेत, असे देखील संजय राऊत या वेळी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:00 PM 15-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here