बहिणीला भेटून परतणाऱ्या भावाला वाटेतच मृत्यूने गाठले

0

◼️ दुचाकी वळवताना भरधाव मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू

गुहागर : तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे बहिणीला भेटून दुचाकीवरुन परतणार्‍या भावाला भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडला. हा अपघात 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम नार्वेकर (52, जानवळे, ओझरवाडी, गुहागर) हे आपल्या दुचाकीवरुन बहिणीला भेटण्यासाठी वेळंब येथे गेले. बहिणीला भेटून निघताना रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी वळली याचवेळी शृंगारतळीच्या बाजूने भरधाव वेगाने येणार्‍या यामाहा एफ.झेड. दुचाकीने जोरदार धडक दिली. यात नार्वेकर यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या दुचाकीवरील स्वारालाही गंभीर दुखापत झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघाताची खबर नार्वेकर यांचा पुतण्या अजय नार्वेकर (33, वेळंब गुहागर) यांनी गुहागर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार यामाहावरील दुचाकीस्वार साईफ हानिफ तवसाळकर (रा. पडवे, गुहागर) याच्यावर भादविकलम 304 (अ), 279, 337, 338, मोटरवाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:13 PM 15-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here