रिफायनरी विरोधी संघटना एकमताने विसर्जित – भाई सामंत

0

नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी लढ्यात शेतकरी, मच्छीमार बांधवांना संघटीत करून शासनाला प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यास भाग पाडणाऱ्या रिफायनरी विरोधी शेतकरी मच्छीमार संघटना विसर्जीत करण्यात आली आहे. नाणार रिफायनरीचा विषय संपल्याने संघटना विसर्जीत करण्यात आल्याची माहिती संघटना सचिव भाई सामंत यांनी दिली. नाणार रिफायनरी विरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेची सभा संघटनेचे सामंत यांच्या मातोश्री सभागृहामध्ये घेण्यात आली. या सभेत संघटना विसर्जीत करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सामाजिक विकासासाठी आता शेतकरी मच्छीमार सामाजिक विकास संघटना या नावाने नवीन सामाजिक संघटना स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढील चार दिवसांत संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याचे सचिव भाई सामंत यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here