जिल्ह्यात 19 नवे कोरोना पॉझिटिव्ह, एका मृत्यूची नोंद

0

रत्नागिरी : मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 911 तापसण्यांमध्ये 19 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 28 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 24 तासात 28 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 49 हजार 464 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.60 टक्के आहे. नव्याने 19 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 334 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 527 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 101 तर संस्थात्मक विलगीकरणात 404 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 16-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here