अनिल परबांनी केली प्रवीण दरेकरांची बोलती बंद

0

‘महिलांच्या सुरक्षेसाठी गरज पडली तर कठोर कायदा करु, पण माहिलंच्या पाठीशी समाजाने उभे राहायला हवे. पक्षनीवेश बाजूला ठेवून महिलांना कमी लेखणाऱ्या नतद्रष्ट नेत्यांना, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याला बाजूला सारले जायला हवे’, असे सडेतोड उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तरीही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणत असतील की त्यांना बोलू दिले नाही, तर त्यांना संसदीय कार्यपद्धती शिकण्याची गरज आहे, असे खरमरीत उत्तर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिले आहे. परब म्हणाले, दरेकर यांना सभागृहाचे कामकाज कसे चालते, नियम काय आहेत, हे माहीत नसावे. खरे तर सभागृह नेता किंवा मुख्यमंत्री यांनी कुठल्याही चर्चेला उत्तर दिल्यावर त्यानंतर विरोधी पक्षाला प्रत्युत्तराचा अधिकार नसतो. दरेकर साहेब, तुम्ही नवीन आहात, आम्ही समजू शकतो की अजूनही तुम्हाला स्वतःच्या मनाने बोलण्याचा अधिकार नाही, तुमचे बोलविते धनी तुमच्या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर बसतात आणि काय बोलावे याचे निर्देश तुम्हाला देत असतात.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here