गुहागरमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचा ८ मार्चला उद्घाटन समारंभ

0

गुहागर तालुक्यासाठीच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीचे काम पूर्ण झाले असून ८ मार्च रोजी दुपारी ३.४५ वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटन कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरीचे अब्दुल सलिम अहमद हुसैन शहापुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १, गुहागरच्या पूजा आ. आपटे, वकील संघ, गुहागर अध्यक्ष अॅड. मनाली आरेकर यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here