महिलांसाठी कागदी, कापडी पिशव्या बनविण्याचे मोफत प्रशिक्षण

0

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत महिलांसाठी कागदी आणि कापडी पिशव्या बनविण्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षण ४ ते १३ मार्चदरम्यान सलग १० दिवस सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. संस्थेच्या साईनगर येथील कार्यालयात प्रशिक्षण देणण्यात येईल.

चोवीस महिला प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात विविध प्रकारच्या कागदी पिशव्या, लखोटा, फाइल, भाजीची पिशवी, बनियन, समोसा, झोला बॅग, पाऊच शिकविले जाणार आहेत. हे प्रशिक्षण मोफत असून चहा, नाष्टा, जेवण आणि निवासाची व्यवस्था विनामूल्य केली आहे. प्रशिक्षणासाठी १८ ते ४५ वयोगटातील रत्नागिरी जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. लाभार्थ्याला शिवणयंत्र चालवता येणे आवश्यक आहे.

अर्ज भरणासाठी येताना १ फोटो, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियान यांच्यामार्फत देण्यात येणारे शिफारस पत्र, दारिद्रय रेषेखाली असल्यास दाखला कार्यालयीन वेळेत पत्त्यावर घेऊन यावे. अर्ज भरल्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना फोनद्वारे कळविण्यात येईल. २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साईनगर, आर.टी.ओ. रोड, कुवारबाव, रत्नागिरी येथे शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज आणून द्यावेत. अधिक माहितीसाठी 9284034438 किंवा (02352) 299191 या क्रमांकावर संपर्क साधावा.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:58 PM 16-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here