संजय राऊत यांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे; नारायण राणेंचा हल्लाबोल

0

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल १५ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद होत आहे.

> पत्रकार परिषद सुरू होताच नारायण राणे यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल. १५ तारखेला आपण आंतरराष्ट्रीय परिषद पाहिली.

> ते म्हणतात शिवसेना मर्द आहे. मर्द माणसाला मर्द सांगण्याची आवश्यकता नाही वाटत. ते म्हणतात की मी कोणाला घाबरत नाही. जो घाबरतो तोच असे बोलतो- नारायण राणे यांचा खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल.

> मला पद न दिल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर आणेन असे संजय राऊत म्हणाले होते- नारायण राणेंचा आरोप.

> संजय राऊत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडी व्यक्तव्ये केलेली आहेत. माझ्याकडे त्याबाबत पुरावे आहेत- नारायण राणे.

> संजय राऊत यांचे लक्ष उद्धव ठाकरेच्या खुर्चीवर आहे. हा शिवसेनेचा नाही आहे. ते पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे- राणे यांचा घणाघाती हल्ला.

> संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे, वेळ आल्यानंतर बाहेर काढेन- नारायण राणे.

> संजय राऊत हे पत्रकार नाहीत- नारायण राणे.

> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केल्याचे सांगत राणे यांनी शिवसेनाप्रमुखांची छापून आलेली काही वाक्ये वाचून दाखवली.

> संजय राऊत शिवसेनेत कधी आले?- राणे यांचा सवाल.

> संंजय राऊत हे शिवसेनाप्रमुखासारखे वागत होते- नारायण राणे.

> संजय राऊत यांना घाम का फुटला होता?- नारायण राणे यांचा सवाल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:33 PM 16-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here