औरंगाबाद विमानतळाचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज असे होणार

0

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे औरंगाबाद विमानतळाचे नाव होणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधींकडून विमानतळाचे नामांतर करण्याची मागणी होत असून याबाबतचा ठराव औरंगाबाद महापालिकेनेही संमत केला आहे. हा मुद्दा लोकसभेतही उपस्थित करण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर आता याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मान्यता दिली जाईल. यानंतर केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here