जिल्ह्यात १८ नवे कोरोना रुग्ण

0

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (दि. १६ फेब्रुवारी) १८ नवे रुग्ण आढळले, तर ३९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २८७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ८१, तर लक्षणे असलेले २०६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ८१, तर संस्थात्मक विलगीकरणात २०६ जण आहेत.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ३५२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ५०३ म्हणजे ९६.६२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३१५ पैकी ३०१ निगेटिव्ह, तर १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४६६ पैकी ४६२ नमुने निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख १८ हजार ३६६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.एकूण ३५ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८३, तर डीसीएचमध्ये १२३ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी ५, तर अतिदक्षता विभागात ५ रुग्ण दाखल आहेत.आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५२७ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.७१ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३ टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १५ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ६५ सत्रे पार पडली. त्यात २३९ जणांनी लशीचा पहिला, तर १,७४२ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १,९८१ जणांचे लसीकरण १५ फेब्रुवारीला झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ९१६ जणांनी १५ फेब्रुवारीला लस घेतली, तर ४०१ जणांनी बूस्टर डोस घेतला. १५ फेब्रुवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५० हजार ८८२ जणांचा पहिला, तर ८ लाख ४४ हजार ३०४ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ९५ हजार १८६ जणांचे लसीकरण झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:43 PM 16-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here