पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमार्फत आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन

0

पाटपन्हाळे : गुहागर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे ग्रा.पं.ने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत आरोग्य विषयक महाशिबिराचे १९ फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे.

पाटपन्हाळे ग्रा.पं. हि नेहमीच शासनाच्या विविध स्तरावरच्या योजना राबविणे, स्वच्छता, आरोग्य, शैक्षणिकदृष्ट्या लक्ष ठेवून उपाय योजना करीत असते.

कोरोना काळातही कोरोना संबंधातील उपाययोजना, जनजागृती करुन कोरोनाला हद्दपार करीत शासनाच्या पारितोषिकास पात्र ठरलेली हि ग्रामपंचायत आहे. घनकचरा यासाठीही या ग्रामपंचायतचे योग्य नियोजन आहे. या ग्रा.पं.चे सरपंच संजय पवार, उपसरपंच उमेश कदम, सर्व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी आर. जी. बेंडल व ग्रा.पं.चे सर्व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून मेहनतहि घेतली होती.

त्याचप्रमाणे १५ वा वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विषयक महाशिबिराचे आयोजन दि.१९ फेब्रुवारी रोजी ग्रा.पं.पाटपन्हाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये केले आहे. यामध्ये ४० वर्षावरील व्यक्तींची मधुमेह तपासणी करुन औषधोपचार पुरविणे, वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करणे, किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करुन आवश्यक औषधोपचार पुरविणे तसेच वृद्धांकरिता चष्मे व आधारकाठी पुरविणे अशा प्रकारच्या तपासण्या होणार आहेत. यासाठी डॉ. अक्षय चौगुले, डॉ. गौतम कुलकर्णी, डॉ. भक्ती पालांडे व डॉ. प्राजक्ता जाधव असे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, पोलीस निरीक्षक श्री. जाधव व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जहांगीर उपस्थित राहणार आहेत. या महाशिबिराचा लाभ फक्त ग्रा.पं. पाटपन्हाळे हद्दीतील मतदार ग्रामस्थांनाच देण्यात येणार आहे. पाटपन्हाळे गावातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच संजय पवार यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 17-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here