मी.. समर्थ कल्याणकारी योजनेच्या सदस्यपदी रेखा राजेशिर्के यांची नियुक्ती

0

चिपळूण : आ. शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या शासनाच्या मी.. समर्थ कल्याणकारी योजनेच्या सदस्यपदी रेखा संभाजी राजेशिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेखा राजेशिर्के या चिपळुणातील अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आहेत.

दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के राखीव निधी ठेवला जातो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही समिती काम करणार आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून आ. शेखर निकम, तसेच सदस्य सचिव म्हणून तहसीलदार जयराज सूर्यवंशी, सदस्य म्हणून गटविकास अधिकारी प्रशांत राऊत तसेच नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी आदींचा यामध्ये समावेश आहे व सदस्य (मी..समर्थ व्यक्ती प्रवर्ग) म्हणून रवींद्र घाणेकर (कोंडमळा), रेखा राजेशिर्के (चिपळूण), सुलतान सय्यद (पोफळी) आदींचा समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here