उपमुख्यमंत्री अजित पवार आज ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधीमंडळात मांडत आहे. यावेळी स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच राज्यातील 80 टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
