दापोली नगर पंचायतीच्या विषय समित्यांची निवड

0

दापोली : दापोली नगर पंचायतीच्या विषय समित्यांचे गठन १७ रोजी करण्यात आले. यावेळी स्वीकृत सदस्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

दापोली नगर पंचायतीच्या विषय समित्यांच्या सदस्यांची गुरुवारी निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य समिती खालिद रखांगे उपनगराध्यक्ष व पदसिद्ध सभापती, आरिफ मेमन सदस्य, नौशिन गिलगिले सदस्य, मेहबूब तळघरकर सदस्य. सार्व. बांधकाम समिती विलास शिगवण सभापती, रवींद्र क्षीरसागर सदस्य, अरिफ मेमन सदस्य, संतोष कलकुटके सदस्य पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती अझीम चिपळूणकर सभापती, रवींद्र क्षीरसागर सदस्य, अन्वर रखांगे सदस्य, अश्विनी लांजेकर सदस्य. महिला व बालकल्याण समिती साधना बोत्रे सभापती, नौशिन गिलगीले उपसभापती, जया साळवी सदस्य, अश्विनी लांजेकर सदस्य. स्थायी समितीममता मोरे नगराध्यक्ष व पदसिद्ध सभापती, खालिद रखांगे, उपनगराध्यक्ष व सदस्य सभापती, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य समिती, विलास शिगवण, सदस्य तथा सभापती सार्वजनिक बांधकाम समिती, अझिम चिपळूणकर, सदस्य तथा सभापती पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती, साधना बोत्रे,सदस्य तथा सभापती महिला व बालकल्याण समिती. सर्व विषय समिती सदस्यांची निवड तसेच सभापती निवड बिनविरोध झाली.

राष्ट्रवादीचे गटनेते खालिद रखांगे यांनी स्वीकृत सदस्य म्हणून नादिर रखांगे यांचे तर शिवसेनेचे गटनेते रवींद्र क्षीरसागर यांनी स्वीकृत सदस्य म्हणून हृषिकेश गुजर यांचे नाव सुचविले. या दोघांचीही दापोली नगरपंचायतीचे स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून श्रीकांत गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी काम पहिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 18-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here