आडिवरे-बेनगी येथील वारीशे गुरुजी यांचं दुःखद निधन

0

राजापूर : राजापूर तालुक्यातील आडिवरे-बेनगी येथील सेवानिवृत्त शिक्षक शंकर गोविंद वारीशे वय ८७ यांचे गुरूवार दि. १० फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.

सन १९५५ साली ते शिक्षक म्हणून रूजू झाले आणि १९९१ ला सेवानिवृत्त झाले. त्यावेळी कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा नसतानाही त्यांनी भालावली, धाऊलवल्ली, शिवार आंबेरे या गावातील शाळेत पायी प्रवास करत मुलांना शिक्षण दिले.

त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आजही मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. ते मनमिळाऊ, परोपकारी आणि गोरगरिबांना आधार देणारे तसेच अभ्यासू वृत्तीचे आणि दूरदृष्टी विचारांचे होते.

त्यांनी त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या विशुध्द आचरणाने एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. त्यांनी आपल्या सर्व मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.

त्यांच्या अचानक जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 18-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here