महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२० : प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार

0

महाविकास आघाडी सरकाराच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवार (दि. 6 मार्च) विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. राज्य आर्थिक पाहणी अहवालात राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली होती. वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या ३७ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकाराकडून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सरकारनं महत्वाच्या घोषणा केल्या. महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून महिला सुरक्षेला सरकारचं प्राधान्य असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसंच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here