जयगड येथे हातभट्टीवर कारवाई

0

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे तसेच विदेशी दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली.

ही कारवाई १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ७.०५ वा. कालावधीत कोळीसरे आणि वाटद खंडाळा स्टँडजवळ करण्यात आली. यात दोन संशयितांकडे एकूण ८ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तुकाराम बाब्या आखाडे (४२,रा. कोळेसरे धनगरवाडी, रत्नागिरी) आणि महेश राजेंद्र शहा (५७,रा.वाटद खंडाळा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

यातील तुकाराम आखाडेकडून हातभट्टीची ९९० रुपयांची १९ लिटर दारू तर महेश शहाकडून ७ हजार ५४५ रुपयांची विदेशी दारू असा एकूण ८ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:02 PM 18-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here