ग्रामीण भागातील कमी लोकसंख्येमुळे आरोग्य केंद्राच्या स्थापनेसाठी अडचणी – राज्य सरकार

0

रत्नागिरी: कोकणातील ग्रामीण भागात कमी लोकसंख्येमुळे आरोग्य उपकेंद्राच्या स्थापनेसाठी अडचणी येत असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नियमामुळे अडचणी असल्याचे स्पष्ट केले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या स्थापनेसाठी लोकसंख्येचा निकष ५ हजार ठेवण्यात आला आहे. मात्र, कोकणातील ग्रामीण भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य उपकेंद्राच्या स्थापनेस अडचणी येत असल्याचा तारांकित प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी मांडला होता. त्यावेळी मंत्री राजेश टोपे यांनी अंशत खरे असल्याचे उत्तर दिले. आरोग्य विभागाच्या बृहत आराखड्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २ उपकेंद्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १ उपकेंद्र नव्याने मंजूर करण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील विरसई गावाची लोकसंख्या ६८० आहे. डवली उपकेंद्रांपासून विरसई पाच किलोमीटरवर आहे. विरसई परिसरातील ५ गावांची लोकसंख्या २ हजार ३७१ आहे. त्यामुळे तेथे नवीन उपकेंद्र स्थापन करण्यात येणार नसल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here