गोवळकोट येथील गोविंदगडावर आज शिवजयंती

0

चिपळूण : गड-किल्ले संवर्धन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राजे सामाजिक प्रतिष्ठान आणि गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने गोवळकोट येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर शनिवार दि. १९ रोजी शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

गोविंदगडावर सकाळी ७ वा. पारंपरिक गडपूजन, देवी रेडजाई मातेची शास्त्रोक्त पूजा, ७.३० वा. ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावरील ध्वजपूजन आणि शिवप्रतिमेचे शास्त्रोक्त मंत्रोच्चारात विधिवत पूजन होईल. दुपारच्या सत्रात विविध सामाजिक उपक्रम पार पडतील. सायंकाळी ७ वा. ह.भ.प. रोहित महाराज आग्रे (काडवली) यांचे शिवचरित्रपर कीर्तन होईल. कीर्तनास साथ-संगत वारकरी संप्रदाय गोवळकोट यांची असणार आहे.

तरी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट आणि गोवळकोट ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:14 AM 19-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here