महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. सोबत पती रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असतील, असे खा. संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ‘राममंदिर सर्वांचं आहे. काँग्रेसच्या लोकांनाही अयोध्येत येण्याबाबत बोलणं झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा अयोध्येत यावं, सर्वांनी मंदिर बांधण्याच्या कामात सहकार्य करावं’, असं आवाहन शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
