टेम्पोला वाचवता वाचवता एस. टी. बस गटारात

0

कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील महामार्गावर सर्व्हिस रोड वरून जाणाऱ्या एसटी बसचा आयशर टेम्पोला वाचविण्याच्या नादात गटारात कलंडन अपघात झाला. सुदैवाने बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. गुरुवारी सकाळी शिवापुरहुन कुडाळ च्या दिशेने येणारी शिवापुर कुडाळ ही बस सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बिबवणे येथील सर्व्हिस रोड वर आली असता अचानक तेथील बॉक्सेलमधून सर्व्हिस रोडवर आयशर टेम्पो आला. या अचानक आलेल्या टेम्पोला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बसला अपघात झाला. चालकाच्या या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here