गुहागरमध्ये व्यापाऱ्यांना मराठीत फलक लावण्यासाठी मनसेचे निवेदन

0

गुहागर : महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता टिकून राहावी, मातृभाषेचा सन्मान व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जागरूक असते. दुकानांवर मराठी नामफलक लावण्यात यावेत यासाठी गुहागर तालुक्यातील व्यापाऱ्यांना मनसेने निवेदन दिले आहे.

निवेदनानुसार, ‘मराठी पाट्या’ या विषयाची गंभीर दाखल घेऊन महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून दुकानांचे नामफलक सुस्पष्ट, ठळक अक्षरात असावेत, असा कायदा संमत केला आहे. याची दखल घेऊन आपण आपल्या दुकानांचे नामफलक सुस्पष्ट आणि ठळक अक्षरात मराठी भाषेत करून कायद्याचे पालन करावे. आमच्या मराठी राजभाषेच्या सन्मानाकरिता व भविष्यातील आंदोलन टाळायचे असेल तर आपण आपली नामफलके तत्काळ सुधारावीत. आपण या निवेदनाची दखल घेत येत्या पंधरा दिवसांत आपल्या दकानांचे नामफलक मराठीत करून घ्यावेत. असे निवेदन गुहागर तालुक्यातील दुकान मालकांना देण्यात आले आहेत.

यावेळी गुहागर तालका अध्यक्ष विनोद जानवलकर, प्रसाद विखारे, तेजस पोफळे, नितीन कारकर, तुषार शिरकर, स्वप्निल कांबळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 19-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here