मुंबईत प्रवीण दरेकरांच्या गाडीला अपघात

0

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला शनिवारी सकाळी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील एनएसजी कॅम्पजवळ अपघात झाला.

गेल्या महिनाभरात दरेकरांच्या ताफ्यातील गाडीला तिसर्यांदा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे तिन्ही अपघातांचे स्वरूप एकसारखे असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

दरेकर म्हणाले की, आज कामानिमित्त जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील एनएसजी कॅम्पजवळून जात असताना त्यांच्या समोरून अचानक एक दुचाकीस्वार आल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी अनेक लोक गाडीत होती. त्यामुळे सहकर्यांना काहीतरी घातपाताचा संशय आहे. तिन्ही अपघातात दुचाकीस्वार अचानक पुढे आल्याने अपघात झाले आहेत. त्यामुळे माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांना देखील संशय निर्माण झाला आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. तसेच मी विरोधी पक्षनेता असल्याने मला राज्यभर फिरावे लागते. परंतु अशा पद्धतीने अपघात होत असल्याने मनात शंका आहे. याआधी मालेगाव, खंडाळा आणि आता मुंबईत अपघात झाला. या तिन्ही वेळी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. १५ दिवसांपासून ही अपघाताची मालिका सुरू असून आजची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे मी चौकशी करणार असल्याचेही दरेकरांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:44 PM 19-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here