नुसता जयजयकार करून चालणार नाही : संभाजीराजे भोसले

0

पुणे : शिवाजी महाराज हे सर्वांसाठी आदर्श आहेत. असा जगात कुठलाच राजा झाला नाही की ३०० वर्षांनंतरही सर्व जण प्रेरणा शिवभक्त घेऊन जातात. माझी शिवभक्तांना विनंती एकच राहील. नुसता जयजयकार करून चालणार नाही. पण शिवाजी महाराजांचा आचार-विचार, त्यांचं आत्मचिंतन करून आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे पुढे जाऊ शकतो, या दृष्टीकोनातून बघावं असे आवाहन भोसले घराण्याचे वंशज संभाजीराजे भोसले यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात शिवभक्त मंडळी सोहळा साजरा करत आहेत. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाचा उत्साह देशभरातून ओसंडून वाहत आहे.

दरम्यान, आज सकाळी शिवनेरीवर दरवर्षीप्रमाणे शिवजन्माचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:52 PM 19-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here