राज्यातील ग्रंथालये होणार डिजिटल : जेष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी मानले उदय सामंतांचे आभार

0

राज्यातील वाचन चळवळ टिकविण्यात ग्रंथालये महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात.त्यामुळे राज्यातील ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील अधिवेशनात नवे धोरण सादर करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील ग्रंथालये डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबईतील ग्रंथालयांपासून या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. जेष्ठ पत्रकार प्रताब आसबे यांनी या निर्णयाबद्दल ना. उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

IMG-20220514-WA0009

”मा. उदय सामंतजी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला आपण दिलेला शब्द पाळला याबद्दल आपले खूपखूप आभार. आपण डिजिटायझेशन या अत्यंत महत्वाच्या मूलभूत कामाच्या प्रारंभाकरिता दिलेली मदत ऐतिहासिक महत्वाची ठरेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेत्रुत्वाखालील महा आघाडी सरकाचेही मनापासुन आभार. धन्यवाद” : प्रताप आसबे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here