नाट्यस्पर्धेचे रत्नागिरीत आज उद्घाटन

0

रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर २२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दि. २१ रोजी सायंकाळी ७.०० वाजता स्पर्धे चे उद्घाटन समारंभ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणा आहे.

या समारंभात झूम मीटिंगद्वारे मुंबईहून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. एकाच वेळी राज्यतील १९ केंद्रांवर हा उद्घाटन समारंभ साजरा होणार आहे. उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड तसेच अ. भा. नाट्य परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी केंद्रावर २२ रोजी राजयोग कलामंच मुचरीचे प्रतिमा : एक गाणे, २३ रोजी सागरदीप मंडळ, पालशेतचे थैमान, २४ रोजी समर्थ रंगभूमी रत्नागिरीचे लिअरने जगावं की मरावं?, २५ रोजी संकल्प कलामंच रत्नागिरीचे खुराई, २६ रोजी शिक्षण प्रसारक मंडळ गावडे आंबेरेचे तुका म्हणे, २७ रोजी श्री भैरीदेव देवस्थान जांभारीचे मु. पो. किन्नोर आणि दि. २८ रोजी श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ, धामणसेचे नमान या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here