‘भंडारी श्री’ आशिष विलणकर याचा रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनतर्फे सत्कार

0

रत्नागिरी : भंडारी श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत चांदीच्या गदेचा मानकरी ठरलेल्या आशिष विलणकर याचा रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन व मित्रपरिवारांकडून शनिवारी सत्कार करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत भंडारी श्री या मानाच्या गदेचा मानकरी ठरलेल्या आशिष विलणकर याचा जिल्हा कुस्ती असोसिएशन व मित्रपरिवारांकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ह्रद्य सत्कार करण्यात आला. अमित विलणकर यांच्याकडून चांदीच्या गदेचे मानचिन्ह भेट देण्यात आले.

यावेळी कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई उर्फ श्रीकृष्ण विलणकर,सचिव सदानंद जोशी, उपाध्यक्ष अमित विलणकर, आनंद तापेकर तसेच विलास उर्फ अण्णा विलणकर, मुकुंद विलणकर, शिवराम विलणकर, अजय विलणकर, राजन भाई उर्फ आर.के.विलणकर, अमोल विलणकर, समीर उर्फ बबलू विलणकर, सागर विलणकर आणि अनिकेत नागवेकर उपस्थित होते.

आशिष विलणकर यांनी यापूर्वीही अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक स्पर्धेत त्यांनी पदके मिळवली आहेत. पण भंडारी श्री स्पर्धेचे विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे असे आशिष विलणकर यांनी आवर्जून नमूद केले. जिल्हा कुस्ती असोसिएशन व मित्रपरिवारांकडून करण्यात आलेला हा सत्कार भविष्यात शरीर सौष्ठव क्षेत्रात आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी बळ देत राहिल असेही त्याने सत्काराला उत्तर देताना सांगितले. जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आशिष विलणकर याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here