पाटपन्हाळेत दुचाकीला अपघात; दोघेजण जखमी

0

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या मार्गात आलेली व्हॅन टाळताना दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या लोखंडी फलकावर आपटले. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.

गुहागर-शृंगारतळी मार्गावर पाटपन्हाळे एसटी थांब्याच्या आधी परचुरे यांच्या घरालगत शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. मोडकाआगरकडून माजी सैनिक भार्गव जोशी हे मारुती व्हॅन घेऊन येत होते. यावेळी शृंगारतळी मार्गावर पाटपन्हाळे येथील परचुरे यांच्या घराजवळ आले. त्यांना घराच्या बाजूने वळायचे होते. याचवेळी शृंगारतळीकडून गुहागरकडे भरधाव वेगाने दुचाकी घेऊन कल्पेश मालप (रा. वरवेली) येत होता. त्याने व्हॅनला होणारी धडक चुकविण्यासाठी बाजू घेतली. मात्र, दुचाकीला वेग असल्याने व्हॅनची निसटती धडक दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकी लोखंडी फलकावर जाऊन आदळली.

यामुळे लोखंडी फलक उखडून कल्पेश व वैभव जोशी (रा. गुहागर-कीर्तनवाडी) यांच्या अंगावर पडला. त्यामुळे दोघेही जखमी झाले. बांधकाम व्यावसायिक गुलाम तांडेल यांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here