परचुरी येथे ४५ ब्रास अवैध वाळू साठा जप्त

0

गुहागर : तालुक्यातील परचुरी येथे अवैध वाळू साठा प्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली असून ४५ ब्रास वाळू गुहागर महसूल विभागाने जप्त केली आहे.

वाळू वाहतूक करणाऱ्या पाच बोटी गायब आहेत. येथे वाळू उपसा करणारे जंगलात पळून गेल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले. परचुरी येथे अवैध वाळू व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी याची दखल घेत गेले चार दिवस सर्कल अधिकारी व तलाठी यांची टिम परचुरी येथे जात होती. गावात वाळू उपशासाठी असलेले परप्रांतीय कर्मचारी तलाठ्यांना दिसले. त्यांनी त्यांचे आधारकार्ड दाखवण्यास मागितले असता, आपण पकडले जाणार या भितीने या परप्रांतीयांनी जंगलातून पलायन केले. यामुळे वाळू उपसा बंद झाला. परंतु यापूर्वी उत्खनन केलेली वाळू गावात तीन ठिकाणी साठा करून ठेवण्यात आली होती. शुक्रवारी तहसिलदार प्रतिभा वराळे यांनी परचुरी येथे भेट दिली असता तीन ठिकाणी वाळूसाठा झाडांच्या फांद्यांमध्ये दडवून ठेवलेला होता. महसूल विभागाने हा अवैध वाळू साठा जप्त केला असून ज्या जागेत सापडला त्या जागा मालकाला महसूल विभागाने नोटीस काढून सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीनंतर या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे.

यानंतर आता परचुरी खाडीमध्ये कायमची गस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख तेथील ग्रामपंचायत व पोलिस ठाण्यात देण्यात यावी, अशी सूचना तेथील पोलिस पाटील यांना देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:44 PM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here