रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत पुरस्कृत व ओम साई स्पोर्टस् रत्नागिरी आयोजित डे-नाईट टेनिस बॉल ओव्हर आर्म रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर लीग २०२२ क्रिकेट स्पर्धेला मंगळवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, न.प. चे मुख्याधिकारी तुषार बाबर, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत यांच्या हस्ते होणार आहे. क्रिकेटप्रेमींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन ओमसाई स्पोर्टस् रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 21-Feb-22